पनवेलच्या पडघे गावाला पुराचा वेढा, वाहनं गेली वाहून तर गुडघ्याभर पाण्यातून नागरिकांची कसरत
पडघे गावाजवळून वाहणाऱ्या कासाडी नदीला पूर आल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. इतकंच नाहीतर पूराच्या पाण्यात अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत. पनवेल परिसरात अजूनही मुसळधार पाऊस कोसळतोय. कासाडी नदीचं पाणी पनवेल शहरात अनेकांच्या घरात शिरल्याने सतर्कतेचा इशारा
राज्यभरात पावसाची संततधार सुरू आहे. काल मध्यरात्रीपासून कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि पनवेलमध्ये पडणाऱ्या पावसाने जोर धरला आहे. पनवेलमधील पडघे गावाला पुराचा वेढा पडला आहे. पडघे गावाजवळून वाहणाऱ्या कासाडी नदीला पूर आल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. इतकंच नाहीतर पूराच्या पाण्यात अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत. पनवेल परिसरात अजूनही मुसळधार पाऊस कोसळतोय. कासाडी नदीचं पाणी पनवेल शहरात अनेकांच्या घरात शिरल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पडघे गावात पुराचं पाणी शिरल्याने मुसळधार पावसाचा फटका अनेक गावांना देखील बसला आहे. दरम्यान, पनवेलमधील पडघे गावात तुफान पाऊस झाल्याने एक किलोमीटर परिसरात पावसाचं गुडघाभर पाणी साचलं आहे. त्यामुळे गावकऱ्यांना आपलं घर गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे साचलेलं पाणी कधी ओसरणार याची प्रतीक्षा गावकरी करत आहेत.