दिल्लीसह उत्तर भारतात यलो अलर्ट, हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार बर्फवृष्टी
राजधानी नवी दिल्लीसह उत्तर भारतात यलो अलर्ट देण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत असल्याची माहिती आहे. नवी दिल्लीसह एनसीआरमध्ये आजचा दिवस थंडीचा असल्याचं हवामान खात्याच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
राजधानी नवी दिल्लीसह उत्तर भारतात यलो अलर्ट देण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत असल्याची माहिती आहे. नवी दिल्लीसह एनसीआरमध्ये आजचा दिवस थंडीचा असल्याचं हवामान खात्याच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. नवी दिल्लीत जानेवारी महिन्यातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. उत्तर भारतातील हवामानामुळं महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील थंडीची तीव्रता पुन्हा वाढणार आहे. राजधानी नवी दिल्लीत मोठ्या प्रमाणामध्ये धुकं आढळून आलं आहे. नवी दिल्ली मधील दृश्यमानता 200 मीटरवर पोहोचली आहे.