देशातील सर्वात उंच धबधबा साताऱ्यात, ‘भांबवली-वजराई’चं मनमोहक सौंदर्य तुम्ही पाहिलंय का?

| Updated on: Jul 10, 2024 | 5:12 PM

सातारा जिल्ह्यात पावसाने जोरदार मुसंडी मारली असून जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेला भारतातील सर्वात उंच भांबवली धबधबा ओसंडून वाहू लागल्याचे दिसतेय. भांबवली या धबधब्याची उंची तब्बल 1 हजार 840 फूट म्हणजेच 560 मीटर आहे. या धबधब्याचे पाणी हे तीन टप्प्यात जमीनीवर कोसळते, बघा या धबधब्याचे विहंगम दृश्य.

Follow us on

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने चांगलीच हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. सातारा जिल्ह्यात पावसाने जोरदार मुसंडी मारली असून जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेला भारतातील सर्वात उंच भांबवली धबधबा ओसंडून वाहू लागल्याचे दिसतेय. भांबवली या धबधब्याची उंची तब्बल 1 हजार 840 फूट म्हणजेच 560 मीटर आहे. या धबधब्याचे पाणी हे तीन टप्प्यात जमीनीवर कोसळत असून हा धबधबा सरळ उभ्या दगडावरून वाहतो. सध्या होत असलेल्या मुसळधार पावसामुळे कास तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे याच्या सांडव्यावरुन पडणाऱ्या पाण्यापासून पुढे 5 किलोमीटर या धबधब्याचे विहंगम दृश्य पहायला मिळत आहे. Tv9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी खास या धबधब्याचे विहंगम दृश्य… बघा व्हिडीओ