Mumbai Rain Update : सोमवारच्या अतिवृष्टीनंतर आज पावसाची काय स्थिती? मुंबईच्या लाइफलाइनचेही बघा अपडेट्स
मुंबईकरांना काल मुसळधार पावसानं चांगलंच झो़डपून काढलं होतं. मुंबईतील सखल भागात पाणी देखील भरल्याने नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली होती. अशातच मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुंबईत रात्रीपासून पडणाऱ्या पावसाने पहाटेपासून काहिशी विश्रांती घेतली आहे.
मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाने मुंबईकरांना चांगलंच झो़डपून काढलं होतं. मुंबईतील सखल भागात पाणी देखील भरल्याने नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली होती. अशातच मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुंबईत रात्रीपासून पडणाऱ्या पावसाने पहाटेपासून काहिशी विश्रांती घेतली आहे. मात्र मुंबईसह उपनागरात ढगाळ वातावरण कायम आहे. तर मुंबईतील तिनही रेल्वे मार्गाची वाहतूक सुरळीत असल्याने लोकल प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मात्र मुंबईला आज हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासबोतच पुणे, रायगड, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबईमधील शाळा-महाविद्यालयांना अतिवृष्टीच्या अलर्टमुळे सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Published on: Jul 09, 2024 12:11 PM