Mumbai Rain Forecast : मुंबईत पहाटेपासून हलक्या सरी, येत्या 24 तासांत कसा असेल पावसाचा जोर? IMD चा अंदाज काय?
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मुंबई आणि उपनगरमध्ये २४ तास हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दादर चौपाटीच्या समुद्राच्या लाटा या किनाऱ्यावर येऊन धडकत आहे. जवळपास ३ ते साडे ३ मीटर उंच अशा लाटा किनाऱ्यावर येऊन आदळत असल्याचे चित्र आहे.
मुंबईमध्ये आज पहाटेपासूनच पावसाच्या हलक्या सरी पडताना दिसताय. तर हवामान विभागाने मुंबईच्या पावसासंदर्भात एक अपडेट दिली आहे. मुंबईत आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मुंबई आणि उपनगरमध्ये २४ तास हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दादर चौपाटीच्या समुद्राच्या लाटा या किनाऱ्यावर येऊन धडकत आहे. जवळपास ३ ते साडे ३ मीटर उंच अशा लाटा किनाऱ्यावर येऊन आदळत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून हायटाईडचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबईत सर्व ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू आहे. यासोबत संपूर्ण महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. तर कोकणासह बुलढाणा, बीड येथे देखील पावसाला सुरूवात झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Published on: Jun 14, 2024 01:20 PM