Vidarbha Rain Forecast : महाराष्ट्रातील जिल्ह्यांना यलो अलर्ट तर विदर्भात पुढील 5 दिवस…

| Updated on: Jun 14, 2024 | 1:00 PM

विदर्भाला पुढील 5 दिवस जोरदार पावसाची इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर यासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्टही दिला आहे. यासह बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे.

Follow us on

हवामान खात्यानं विदर्भासाठी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. विदर्भाला पुढील 5 दिवस जोरदार पावसाची इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर यासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्टही दिला आहे. यासह बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे. तर दुसरीकडे अमरावती जिल्ह्यात यंदा चार दिवसपूर्व मान्सूनचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. १५ ते १६ जूनदरम्यान मान्सूनचा पाऊस होण्याची शक्यता ‘आयएमडी’द्वारा यापूर्वी वर्तविण्यात आली होती. अलीकडच्या काळात मान्सूनच्या आगमनात विविधता दिसून आलेली आहे. १५ जूननंतरच मान्सूनचे आगमन झालेले आहे. यंदा मात्र लवकर आगमन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.