Mumbai Rain Forecast : मुंबईकरांसाठी चिंतेची बातमी, कमी वेळात होणार जास्त पाऊस; ‘या’ महिन्यात पावसाचं थैमान

| Updated on: Jun 12, 2024 | 12:21 PM

Imd Monsoon Rain Forecast Maharashtra Weather update : हवामान बदलामुळे मुंबईमध्ये जुलै महिन्यात पावसाचे थैमान पाहायला मिळणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. इतकंच नाहीतर मुंबईत कमी वेळात जास्त पाऊस कोसळणार असेही हवामान खात्याकडून सांगितले जात आहे.

मुंबईसह राज्यभरात नुकतीच पावसाला सुरूवात झाली आहे. पाऊस सर्वत्र पडत नाहीतर हवामान खात्यानं मुंबईकरांची चिंता वाढवणारी शक्यता वर्तविली आहे. हवामान बदलामुळे मुंबईमध्ये जुलै महिन्यात पावसाचे थैमान पाहायला मिळणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. इतकंच नाहीतर मुंबईत कमी वेळात जास्त पाऊस कोसळणार असेही हवामान खात्याकडून सांगितले जात आहे. जुलै महिन्यात मोठ्या पावसाची शक्यता असल्याची माहिती देखील हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार मुंबईकरांसाठी ही मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. तर दुसरीकडे पुढील पाच दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. कोकणासाठी आज हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट असून कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर अधिक असणार असल्याचेही सांगितले जात आहे.

Published on: Jun 12, 2024 12:21 PM
‘महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी जनतेच्या मनातील…’, राज ठाकरेंच्या वाढदिवसापूर्वीच जोरदार बॅनरबाजी
Saamana On BJP : ‘हलके’ पत्तेच त्यांना ‘भारी’ पडणार… ‘सामना’तून भाजपवर सडकून टीका