बस अजून थोडेच दिवस… ‘या’ तारखेला पाऊस महाराष्ट्रात येणार; Monsoon संबंधित हवामान विभागाची मोठी अपडेट

| Updated on: Jun 03, 2024 | 11:23 AM

विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याचीही माहिती हवामान विभागाने दिली आहे. पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने विदर्भासह मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या अन्य भागात पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून काय वर्तविण्यात आला अंदाज? बघा व्हिडीओ

विदर्भात मान्सूनपूर्व पावसाचा हवामान विभागाकडून अंदाज वर्तविण्यात आला आहे. विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याचीही माहिती हवामान विभागाने दिली आहे. पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने विदर्भासह मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या अन्य भागात पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानुसार, येत्या १० जूनपर्यंत मोसमी पाऊस महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा राज्यात वेळेपूर्वीच मान्सून दाखल होणार असून पावसाचे प्रमाण हे दरवर्षीपेक्षा सरासरी पेक्षा अधिक असणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून हा भारतात दाखल झाला आहे. दरवर्षी केरळ राज्यात ३१ मे पर्यंत मान्सून दाखल होत असतो मात्र यावेळी एक दिवस आधीच ३० मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे कडाक्याच्या उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Published on: Jun 03, 2024 11:23 AM
महाराष्ट्राच्या 48 जागांचा अंदाज, कोण होणार तुमच्या जिल्ह्याचा खासदार? बघा संपूर्ण यादी
एक्झिट पोल म्हणजे गुवाहाटीत कापलेल्या…, ‘सामना’तून मोदींसह भाजपवर हल्लाबोल