Maharashtra Weather Update : कोकण किनारपट्टीला तुफान पावसाचा तडाखा, राज्यातील ‘या’ 5 जिल्ह्यांना IMD चा अलर्ट

| Updated on: Jun 24, 2024 | 11:44 AM

किनारपट्टी भागात पौर्णिमेनंतर उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. कोकण किनारपट्टी भागात साडेतीन मीटर उंचीच्या लाटा उसळत असून समुद्रानं रौद्ररूप धारण केले आहे. किनारपट्टी भागाला लाटांचा तडाखा बसत असून गेल्या 24 तासात 77 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे

Follow us on

राज्यातील ५ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि साताऱ्यात जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यासोबतच कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही हवामान खात्यानं वर्तविली आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. कणकवली, कुडाळ, सावंतवाडीसह इतरही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. थांबून थांबून पावसाच्या सरी कोसळत असल्यामुळे अद्याप कुठेही पाणी साचण्याच्या घटना घडलेल्या नाहीत. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागात पौर्णिमेनंतर उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. कोकण किनारपट्टी भागात साडेतीन मीटर उंचीच्या लाटा उसळत असून समुद्रानं रौद्ररूप धारण केले आहे. किनारपट्टी भागाला लाटांचा तडाखा बसत असून गेल्या 24 तासात 77 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.