Kokan Rain Forecast : कोकणवासियांसाठी मोठी बातमी; कोकणात ऑरेंज अलर्टसह पुढील पाच दिवस…

| Updated on: Jun 12, 2024 | 4:35 PM

Imd Monsoon Rain Forecast Maharashtra Weather Latest Update Today News In Marathi : कोकणासाठी आज हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढील पाच दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या पावसामुळे कोकणातील सौंदर्य बहरल्याचे पाहायला मिळत आहे.

कोकणवासियांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. कोकणासाठी आज हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढील पाच दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या पावसामुळे कोकणातील सौंदर्य बहरल्याचे पाहायला मिळत आहे. रत्नागिरी कोकण किनारपट्टीवर नैऋत्य मोसमी पावसानं वेग धरला आहे. सकाळपासूनच रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहे. तर कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर अधिक असल्याने बरसत असलेल्या पावसामुळे कोकणातील नद्यांच्या पातळीत देखील वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे हवामान खात्यानं मुंबईकरांची चिंता वाढवणारी शक्यता वर्तविली आहे. हवामान बदलामुळे मुंबईमध्ये जुलै महिन्यात पावसाचे थैमान पाहायला मिळणार आहे. मुंबईत कमी वेळात जास्त पाऊस कोसळणार असेही हवामान खात्याकडून सांगितले जात आहे. जुलै महिन्यात मोठ्या पावसाची शक्यता असल्याची माहिती देखील हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

Published on: Jun 12, 2024 03:13 PM
Manoj Jarange Patil : आम्हीही वस्ताद, जिरवल्याशिवाय सोडणार नाही; उपोषणादरम्यान जरांगे पाटलांचा थेट इशारा
माझी बायको म्हणेल तुला खायलाही नाही अन् जेवणही नाही; ‘त्या’ चर्चांवर बजरंग सोनवणे यांचं अफलातून उत्तर