Maharashtra Monsoon Update : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी, राज्यात येत्या 5 दिवसात….
कर्नाटक, केरळ भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तर अरबी समुद्रात मान्सूनच्या प्रवासाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून मिळत आहे. त्यामुळे पावसाआभावी खोळंबलेल्या पेरण्या आता सुरू होणार,,,,
राज्यात येत्या 5 दिवसात पाऊस सर्वदूर बरसणार असल्याची माहिती मिळत आहे. कर्नाटक, केरळ भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तर अरबी समुद्रात मान्सूनच्या प्रवासाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून मिळत आहे. त्यामुळे पावसाआभावी खोळंबलेल्या पेरण्या आता सुरू होणार असल्याने बळीराजाला काहिसा दिलासा मिळणार आहे. तर दुसरीकडे आज मुंबई उपनगरातील कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, गोरेगाव, अंधेरी परिसरात काळ्याकुट्ट ढगांसह मुसळधार पडत आहे. या भागात सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. तर काल भिवंडी, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे या भागात पावसाची तुफान बँटिंग पाहायला मिळाली यामुळे सखल भागात या मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याचे पाहायला मिळाले होते. तर बाजारपेठा देखील पाण्याखाली गेल्या होत्या.
Published on: Jun 21, 2024 02:15 PM