Kokan Rain Update : कोकणात पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट

| Updated on: Jul 12, 2024 | 4:02 PM

Kokan Maharashtra Weather Latest Update : कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुंबईच्या तुलनेने मुसळधार पाऊस... कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पुढचे चार दिवस हवामान खात्याकडून अलर्ट... आजपासून (१२ जुलै, शुक्रवार) पुढील ४ दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा...

Follow us on

सोमवारी राज्यात मुसळधार पाऊस बरसल्यानंतर दोन दिवस पावसाने काहिशी विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर गुरूवारपासून राज्यातील काही भागात पुन्हा मुसळधार पाऊस पडण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान, कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुंबईच्या तुलनेने मुसळधार पाऊस पडणार आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पुढचे चार दिवस हवामान खात्याकडून अलर्ट देण्यात आला आहे. आजपासून (१२ जुलै, शुक्रवार) पुढील ४ दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून तुफान सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरला असला तरी पुन्हा पाऊस बरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकणात दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसाचा जोर अद्याप ओसरला आहे. मात्र पुन्हा एकदा कोकणात पाऊस जोरदार कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तर कोकणातील समुद्र किनाऱ्यावर वाऱ्यांची गती वाढल्याचेही पाहायला मिळत आहे.