Mumbai Rain Update : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी धुव्वाधार… मुसळधार पावसानं दाणादाण, कुठं काय होती स्थिती?

| Updated on: Jul 09, 2024 | 10:34 AM

मुसळधार पावसामुळे कुर्ला रेल्वे स्थानकातील रेल्वे रूळ पाण्याखाली गेले. याचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला. विद्याविहार स्थानकात पाणी साचल्याने ट्रेन एकाच जागी थांबली त्यामुळे प्रवाशांनी रूळावर उड्या मारून आपलं स्टेशन गाठलं. तर दुसरीकडे हार्बर रेल्वे मार्ग देखील मुसळधार पावसामुळे ठप्प झाला होता.

कालपासूनच मुंबईत पावसाने तुफान बॅटिंग केल्याचे पाहायला मिळाले. मुंबई आणि उपनगरात झालेल्या कालच्या पावसामुळे लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली. मुसळधार पावसामुळे कुर्ला रेल्वे स्थानकातील रेल्वे रूळ पाण्याखाली गेले. याचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला. विद्याविहार स्थानकात पाणी साचल्याने ट्रेन एकाच जागी थांबली त्यामुळे प्रवाशांनी रूळावर उड्या मारून आपलं स्टेशन गाठलं. तर दुसरीकडे हार्बर रेल्वे मार्ग देखील मुसळधार पावसामुळे ठप्प झाला होता. तब्बल ५ तासानंतर हार्बर मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. सर्वसामान्यच नाहीतर अधिवेशानासाठी आलेल्या आमदारांनाही या पावसाचा चांगला फटका बसला. विदर्भ, मराठवाड्यातील १०-१२ आमदार एक्स्प्रेसमध्येच अडकले होते. बघा स्पेशल रिपोर्ट आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कशी उडाली मुंबईकरांची दाणादाण…

Published on: Jul 09, 2024 10:33 AM
रायगडावर जाणाऱ्या सर्व वाटा बंद, ढगफूटी सदृश्य पावसाने पायऱ्यांवरुन धबधबा सुरु झाल्याने शासनाचा निर्णय
किल्ले रायगडावर ढगफुटी की आणखी काही? काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ पाहिलात?