Maharashtra Weather Update : राज्यात मध्यरात्रीपासूनच संततधार, तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट? हवामान खात्याकडून मोठं अपडेट

| Updated on: Jul 07, 2024 | 1:10 PM

रत्नागिरी जिल्ह्यात पुढचे तीन दिवस कोकणात मुसळधार पाऊस कोसळणार असून गोवा, कर्नाटकसह कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तविली आहे. तर अरबी समुद्रात देखील कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचा इशारा हवामान खात्याना दिला आहे.

मुंबईच्या अनेक भागात काल रात्रीपासून रिमझिम पाऊस कोसळतोय. तर मुंबईतील दादर परिसरातही पावसाला सुरूवात झाली आहे. कल्याण, डोंबिवली परिसरातही मध्यरात्रीपासूनच पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. तर या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान, सातारा आणि रत्नागिरी या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सोलापूर, मराठवाड्यासह विदर्भाला हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पुढचे तीन दिवस कोकणात मुसळधार पाऊस कोसळणार असून गोवा, कर्नाटकसह कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तविली आहे. तर अरबी समुद्रात देखील कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचा इशारा हवामान खात्याना दिला आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात आँरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Published on: Jul 07, 2024 01:10 PM
Ladki Bahin Yojana : आता ‘लाडकी बहीण’ योजनेचा ‘या’ महिलांना देखील मिळणार लाभ, फडणवीसांनी पुन्हा केलं स्पष्ट
मुख्यमंत्री शिंदेंच्या दरे गावची वाहतूक पूर्णपणे बंद, नेमकं कारण काय?