Maharashtra Weather Update : राज्यात रिमझिम, तुमच्या जिल्ह्यात कसा पाऊस? अलर्ट जारी; हवामान खात्याकडून मोठं अपडेट
गेल्या महिन्याभरात पावसाची दुसऱ्यांदा जोरदार हजेरी पाहायला मिळत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तालुक्यातील धरणात अजून अत्यल्प पाणीसाठा आहे. तर अजूनही बळीराजाला जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. कोणत्या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी शहरात जोरदार हवेसह पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या महिन्याभरात पावसाची दुसऱ्यांदा जोरदार हजेरी पाहायला मिळत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तालुक्यातील धरणात अजून अत्यल्प पाणीसाठा आहे. तर अजूनही बळीराजाला जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. तर खान्देशातील नंदुरबार शहरात आणि तालुक्यातही पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात चांगला पाऊस होत असल्यामुळे आतापर्यंत ७० टक्के पेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. वाशिम जिल्ह्यात जून महिन्यात चांगला पाऊस पडत असल्यामुळे चांगल्या पेरण्या झाल्या आहेत. दुसरीकडे आज रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्याला हवामान खात्याने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. यासह पुणे आणि साताऱ्याला देखील पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.