Maharashtra Rain Forecast : मुंबईसह ‘या’ भागात ‘कोसळधार’, महाराष्ट्रासाठी IMD चा इशारा काय?

| Updated on: Jul 02, 2024 | 1:10 PM

मुंबई आणि उपनगरात रात्री अधून मधून रिमझिम पाऊस पडतोय. दादर, मुंबई सेंट्रल आणि परळसह अनेक परिसरात रिमझिम पाऊस होतोय. ठाणे, कल्याण डोंबिवलीत मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरू असल्याचे पाहायला मिळतेय. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि मुंबई उपनगरात पावसाची रिमझिम सुरू असल्याचे पाहायला मिळतंय

Follow us on

महाराष्ट्रातील पावसासंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात हवामान खात्याकडून आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, कोकण किनारपट्टीसह आणि विदर्भात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबई आणि उपनगरात रात्री अधून मधून रिमझिम पाऊस पडतोय. दादर, मुंबई सेंट्रल आणि परळसह अनेक परिसरात रिमझिम पाऊस होतोय. ठाणे, कल्याण डोंबिवलीत मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरू असल्याचे पाहायला मिळतेय. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि मुंबई उपनगरात पावसाची रिमझिम सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे तर कोकणात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दमदार पाऊस होतो आहे. रात्री पाऊस आणि सकाळनंतर विश्रांती असं सध्या पावसाचं गणित पाहायला मिळतंय. आज देखील हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे.