नागपुरात तुफान बॅटिंग, सर्व शाळांना सुट्टी… राज्यात कोणत्या जिल्ह्याला पाऊस झोडपणार? काय सांगतंय हवामान खातं?
नागपुरातील विमानतळ परिसरात पाणी साचलंय. मुसळधार पावसामुळे नागपुरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज कोसळत असलेल्या पावसानंतर आज आणि उद्याही हवामान खात्याकडून नागपूरला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसाच्या पाण्यानं नागरिकांची चांगलीच दाणादाण उडवली आहे.
नागपुरात देखील सकाळपासून मुसळधार पाऊस होताना दिसतोय. या मुसळधार पावसाचा फटका नागपुरातील अनेक सखल भागांना बसला असून या पावसाच्या पाण्यानं नागरिकांची चांगलीच दाणादाण उडवली आहे. नागपुरातील विमानतळ परिसरात पाणी साचलंय. मुसळधार पावसामुळे नागपुरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज कोसळत असलेल्या पावसानंतर आज आणि उद्याही हवामान खात्याकडून नागपूरला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागपुरातील रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक देखील संथ गतीने सुरू आहे. तर नागरिकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे. अशातच हवामान खात्याने ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, अमरावती, नागपूर, नांदेड या जिल्ह्यांना ऑरेंड अलर्ट तर रत्नागिरी, भंडारा, चंद्रपूर आणि गोंदियाला रेड अलर्ट जारी केला आहे.
Published on: Jul 20, 2024 02:02 PM