Kokan Rain Update : रत्नागिरी जिल्ह्यात धुव्वाधार बॅटिंग, गेल्या 24 तासात ‘इतक्या’ पावसाची नोंद, IMD नं दिला अलर्ट

| Updated on: Jul 13, 2024 | 5:34 PM

तुफान पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. गेल्या 24 तासात तब्बल 90 मीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर संपूर्ण रत्नागिरी तालुक्यात 130 मीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. यासोबत मंडणगड 113, राजापूर तालुक्यात 108 मिलिमीटर पावसाची नोंद

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. तुफान पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. गेल्या 24 तासात तब्बल 90 मीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर संपूर्ण रत्नागिरी तालुक्यात 130 मीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. यासोबत मंडणगड 113, राजापूर तालुक्यात 108 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. दरम्यान, 1 जून पासून आजपर्यंत 1 हजार 576 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात 46 टक्के पाऊस झाला असून आणखीन दोन दिवस असाच पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

Published on: Jul 13, 2024 05:34 PM
Kalyan-Dombivli Rain Update : कल्याण-डोंबिवलीकरांना मुसळधार पावसानं झोडपलं, ‘या’ भागात गुडघाभर पाणी
कोकणातील निसर्गाच्या सौंदर्याची भुरळ प्राण्यांनाही… भातशेतात मोर-लांडोरचा मनमुराद संचार