Maharashtra Weather Update : कोकणात पुढील 4 दिवस धुव्वाधार… मुंबई पुण्यात कसा पाऊस? काय सांगतंय हवामान खातं?
मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यातही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर पालघर, ठाणे, मुंबईला हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पुणे हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. आज कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टी लगत सक्रिय
कोकणात पावसानं कुठं उसंत घेतली असताना आता पुढील चार दिवसांसाठी हवामान खात्याकडून पुन्हा पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यासह मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यातही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर पालघर, ठाणे, मुंबईला हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पुणे हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. आज कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टी लगत सक्रिय आहे. तर पश्चिम बंगालचा उपसागर व दक्षिण ओडिसाच्या किनारालगत असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता दक्षिण छत्तीसगड आणि लगतच्या विदर्भ या भागात आहे. त्यामुळे आज मुंबई, कोकण, गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Published on: Jul 17, 2024 01:35 PM