Mumbai Local Train : अरे भाई ये क्या है… मुंबईची लाईफ-लाईन लिकेज, लोकलच्या डब्यातून पावसाच्या धारा, ही ट्रेन तुमची तर नाही ना?

| Updated on: Jul 13, 2024 | 3:18 PM

Imd Monsoon Rain Forecast Mumbai rain update कसारा-आसनगाव-सीएसटी लोकलच्या डब्यामध्ये गळती लागल्याचे आज पाहायला मिळाले. डब्यात पावसाचे पाणी गळत असल्याने कसारा-आसनगाव-सीएसटी या लोकलने प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत.

मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी एक बातमी समोर येत आहे. कसारा-आसनगाव-सीएसटी लोकलच्या डब्यामध्ये गळती लागल्याचे आज पाहायला मिळाले. डब्यात पावसाचे पाणी गळत असल्याने कसारा-आसनगाव-सीएसटी या लोकलने प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत. कामाला जात असताना या लोकलने प्रवास करताना प्रवाशांना भिजत जावं लागलं. तर लोकलच्या डब्यामध्ये गळती लागल्याने प्रवासी लोकलमधून भिजत प्रवास करत असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कल्याण, ठाणे आणि मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाने नागरिकांना चांगलंच झोडपून काढलं आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाणारी मुंबईची लोकल पूर्णतः विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले होत तर आज कसारा-आसनगाव-सीएसटी लोकलच्या डब्यामध्ये गळती लागल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Published on: Jul 13, 2024 03:18 PM
Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेबद्दल सगळं काही… प्रत्येक महिला लाभार्थी व्हावी म्हणून नागपुरातील 6 विधानसभेत बॅनर
राज्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार की नाही? ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं…