पुणेकरांनो सावध राहा… पुणे परत पाण्याखाली? खडकवासला धरणातून पुन्हा एकदा पाणी सोडणार

| Updated on: Jul 28, 2024 | 1:49 PM

आज दुपारी तीन वाजता पाच हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग खडकवासला धरणातून करण्यात येणार आहे. पुणेकरांचं जीवन पून्हा पूर्ववत होत असताना पुन्हा एकदा खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.

Follow us on

पुण्यातील खडकवासला धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग होणार आहे. दुपारी तीन वाजता पाच हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग खडकवासला धरणातून करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात मुसळधार पावसाने सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत केले होते. आता पुणेकरांचं जीवन पून्हा पूर्ववत होत असताना पुन्हा एकदा खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. खडकवासला परिसरातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणाच्यावरील भागात 25 जुलै रोजी पहाटे 2 ते सकाळी 6 वाजेपर्यंतच्या कालावधीत अतिवृष्टी झाली होती. या 24 तासांत 118 ते 453.5 मी.मी. इतकी अचानक अतिवृष्टी झाली की पुण्यातील काही भाग पाण्यात होते. मात्र आता पुन्हा खडकवासला धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यास परिस्थितीनुसार धरणातून विसर्ग करण्यात येणार आहे. नदीकाठच्या नागरीकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.