मुंबई हवामान विभागाने आज पुणे जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. तसेच नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. तर पुण्यात मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून मध्यरात्री पाणी सोडण्यात आल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर सध्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा कमी करण्यात आला आहे. खडकवासला धरणातून आता केवळ 13000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. 31 हजार क्यूसेकवरून पाण्याचा विसर्ग कमी करत तो केवळ 13 हजार क्युसेक करण्यात आला आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पाऊस थांबल्याने प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला. अशातच पुणे जिल्ह्यात आज मुसळधार पावसामुळे काही मार्ग बदं करण्यात आले आहेत. कोणते आहे ते मार्ग बघा व्हिडीओ…