अखेर Monsoon आला… पावसानं कोकणाला भिजवलं… ‘हा’ जिल्हा ओलाचिंब, पावसाला सुरूवात
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्ले आणि सावंतवाडी तालुक्याच्या काही भागात पावसाच्या सरी आज बरसत आहेत. यामुळे हवेत गारवा पसरला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात सकाळी दहा वाजल्यापासून पाऊस सुरू झाला आहे. हवामान विभागाकडून कोकणाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात मान्सून पूर्व पावसाला सुरूवात झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्ले आणि सावंतवाडी तालुक्याच्या काही भागात पावसाच्या सरी आज बरसत आहेत. यामुळे हवेत गारवा पसरला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात सकाळी दहा वाजल्यापासून पाऊस सुरू झाला आहे. तर हवामान विभागाकडून कोकणाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात मान्सून पूर्व पावसामुळे बाजारपेठेवर काहिसा परिणाम झाला असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याचीही माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे विदर्भात मान्सूनपूर्व पावसाचा हवामान विभागाकडून अंदाज वर्तविण्यात आला आहे. पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने विदर्भासह मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या अन्य भागात पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानुसार, येत्या १० जूनपर्यंत मोसमी पाऊस महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.