MSRTC ST Buses : कोकण रेल्वे ठप्प, अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीला धावली ‘लालपरी’, कुठून किती एसटी बसेसची व्यवस्था

| Updated on: Jul 15, 2024 | 12:43 PM

कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसला आहे. कोकणातील विविध रेल्वे स्थानकांवर खोळंबलेल्या प्रवाशांच्या मदतीला आता एसटी महामंडळाच्या एसटी बसेस मदतीसाठी धावून आल्या आहेत. कोकण रेल्वे ठप्प झाल्यामुळे आता परतीच्या प्रवासासाठी रेल्वे प्रवाशांना.....

कोकणात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे गेल्या १० तासांहून अधिक ठप्प आहे. त्यामुळे कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसला आहे. कोकणातील विविध रेल्वे स्थानकांवर खोळंबलेल्या प्रवाशांच्या मदतीला आता एसटी महामंडळाच्या एसटी बसेस मदतीसाठी धावून आल्या आहेत. कोकण रेल्वे ठप्प झाल्यामुळे आता परतीच्या प्रवासासाठी रेल्वे प्रवाशांना रत्नागिरीतून २५ एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे खोळंबलेल्या प्रवाशांना एसटी बसच्या माध्यमातून सोडलं जाणार आहे. तर रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर शेकडो प्रवासी एसटी बसच्या प्रतीक्षेत आहेत. बस मिळताना अडकलेल्या प्रवाशांना थेट मुंबईत सोडलं जाणार आहे. खेड एसटी प्रशासनाकडून एसटीच्या १० बसेस तर सिंधुदुर्गातून एसटीच्या १७ बसेस सोडल्या जाणार आहेत. कणकवली रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांसाठी पुढील प्रवासासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून एसटीच्या १७ गाड्या सोडण्यात आल्यात. वृद्ध, अपंग व आजारी प्रवाशांसाठी एक स्लीपर बसचीही सोय करण्यात आली आहे. त्यामुळे अडकलेले प्रवासी बसने मुंबईच्या दिशेने रवाना होणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

Published on: Jul 15, 2024 12:41 PM
Kokan Railway Update : कोकण रेल्वे 14-15 तासांपासून ठप्प, प्रवासी अडकले; कधी होणार रेल्वे वाहतूक सुरू?
तासाभराच्या वेटिंगनंतर भेट, छगन भुजबळ सिल्व्हर ओकवर, शरद पवारांची अचानक भेट का?