Weather Change : केरळमध्ये मान्सून दाखल अन् नागपूरात ढगाळ वातावरण

| Updated on: Jun 09, 2023 | 3:40 PM

VIDEO | केरळमध्ये मान्सून दाखल होताच नागपुरात ऊन-सावलीचा खेळ, बघा कसंय वातावरण?

नागपूर : केरळमध्ये मान्सून दाखल होताच नागपुरात वातावरण निर्मितीला सुरुवात झाली आहे. आज सकाळपासूनच नागपूरात ढगाळ वातावरण पाहायला मिळत असून ढगांमध्ये सूर्यदेवता लपल्याचे चित्र पाहायला मिळते, त्यामुळे उन्हाच्या चटक्यापासून विदर्भवासीयांना काहीसा दिलासा मिळत असला तरी उकाडा मात्र कायम असल्याचे पाहायला मिळते. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर साधारणता पंधरा दिवसात तो विदर्भात दाखल होत असतो. मात्र यावेळी आधीच उशिराने आलेला मान्सून विदर्भात केव्हा दाखल होईल ही मान्सूनची चाहूल तर नाही ना ? अशा प्रकारचे चित्र पाहायला मिळत असून मान्सूनची प्रतीक्षा विदर्भवासी करीत आहे. आज राज्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे. १३ जूनपर्यंत कोकणात मान्सून दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यापूर्वीच राज्यात आज मान्सूनपूर्व पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे. उन्हाच्या कडाक्यानं त्रस्त असलेल्या नागरिकांना पावसाची प्रतिक्षा आहे. अशातच नैऋत्य मौसमी वारे काल केरळमध्ये दाखल झाले आहेत.

Published on: Jun 09, 2023 03:40 PM
टिपू सुलतान, औरंगजेब यांचे उदातीकरण खपवून घेणार नाही; भाजप खासदारनं दिला इशारा
Wrestlers Protest | कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषण प्रकरणाला वेगळं वळण, काय घेतली नवी भूमिका