Weather Update IMD : येत्या 48 तासात महाराष्ट्रावर मोठं संकट, ‘या’ राज्यांना हवामान खात्याकडून अलर्ट

| Updated on: Mar 22, 2025 | 10:24 AM

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये या काळात जोरदार वारं वाहणार असून, तापमान 34 अंश सेल्सिअसपर्यंत राहणार आहे. तर झारखंडमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

येत्या 48 तासात महाराष्ट्रावर मोठं संकट येणार असून राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील ४८ तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. यासोबतच अमरावती, वाशिम, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, विदर्भात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने राज्यातील नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, हवामान खात्याने महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला असला तरी यासोबतच पुढील दोन दिवस पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्येही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी नुसता मुसळधार पाऊस कोसळणार नाही तर ५० ते ६० किमी वेगानं वारं वाहण्याची शक्यता असल्याचेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Published on: Mar 22, 2025 10:24 AM
Chitra Wagh : ‘ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो’.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या
Mumbai Mega Block Update : मुंबईकरांनो…रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या मेगाब्लॉक, ‘या’ वेळात प्रवास कराल तर होणार गैरसोय