Fast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी |
कोरोनाची दुसरी लाट संपून तिसरी लाट येऊ नये असे विधान मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी केले. जगामध्ये आता तिसरी लाट येत आहे. त्यामुळे काळजी घेतली पाहिजे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
Fast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी |
1) कोरोनाची दुसरी लाट संपून तिसरी लाट येऊ नये असे विधान मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी केले. जगामध्ये आता तिसरी लाट येत आहे. त्यामुळे काळजी घेतली पाहिजे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
2) राज्यातील पोटनिवडणुकांना सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी याचिका राज्य सरकारने दाखल केली आहे. तसेच ओबीसींचा इम्पेरिकल डाटा मिळेपर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका रद्द कराव्यात अशी याचिका उद्या दाखल केली जाणार आहे.
3) अहमदनगरच्या महापौर तसेच उपमहापौरपदासाठी तीस जूनला निवडणूक होणार आहे. शिवसेनेला महापौरपद तर राष्ट्रवादीला उपमहापौरपद असा फॉर्म्यूला वरिष्ठ पातळीवर ठरला आहे.