Fast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये जरी राजकीय दुरावा निर्माण झाला असला तरी त्यांचे संबंध चांगले आहेत. आजही उद्धव ठाकरे यांच्यासाठी ते नरेंद्रभाईच आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
Fast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी |
1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये जरी राजकीय दुरावा निर्माण झाला असला तरी त्यांचे संबंध चांगले आहेत. आजही उद्धव ठाकरे यांच्यासाठी ते नरेंद्रभाईच आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
2) आंबिल ओढ्याचा प्रकार दुर्दैवी आहे. नागपुरात असं घडलं असतं तर मी जेसीबीखाली झोपलो असतो, असे वक्तव्य मंत्री नितान राऊत यांनी केले आहे.
3) राजू शेट्टी यांनी केंद्रातील कृषी कायद्यासंदर्भात शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी केंद्राच्या या कायद्याविरोधात राज्य सरकारने अधिवेशनात कायदा पारित करावा अशी मागणी त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली.
4) मॉडर्ना लस आयात करण्याची सिप्ला कंपनीला परवानगी मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या लसीच्या आपत्कालीन वापराला लवकरच परवानगी मिळण्याची शक्यता आहे.