पुण्यातील राजकीय नेत्यांना धमकी देऊन खंडणीची मागणी करणाऱ्याला बेड्या, कोण आहे ‘तो’?

| Updated on: Apr 07, 2023 | 10:44 AM

VIDEO | महेश लांडगे, अविनाश बागवे अन् वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी देणारा पोलिसांच्या सापळ्यात, कोण आहे आरोपी अन् कुठून केली अटक

पुणे : भोसरी विधानसभेचे भाजप आमदार महेश लांडगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे आणि पीएमसी माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा पोलिसांच्या जाळ्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून हा व्यक्ती पुण्यातील राजकीय नेत्यांना धमकी देत त्यांच्यांकडून खंडणी मागत होता. पुणे पोलिसांच्या रडारवर तो अनेक दिवसांपासून होता. धमकी देताना तो मुलीच्या नावाचाही वापर करत होता. अखेर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अनेक दिवसापासून पुण्यातील राजकीय नेत्यांना धमकीचे फोन येत होते. राजकीय नेत्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या धमक्यांमुळे पुणे पोलीसांनी वेगाने तपास सुरु केला. आरोपीला पुण्यातील घोरपडी परिसरातून आरोपीला अटक केली. इम्रान शेख असं आरोपीचे नाव आहेत.

Published on: Apr 07, 2023 10:40 AM
माफी मागा, फडणवीस मोठ्या मनाचे; भाजपच्या मोठ्या नेत्याचे ठाकरेंना आवाहन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्यापासून दोन दिवसीय अयोध्या दौऱ्यावर, कसं असणार नियोजन?