VIDEO : Imtiyaz Jaleel यांनी कार्यकर्त्याची नवी कोरी रिक्षा चालवली
खासदार इम्तियाज जलील यांनी तर चक्क आपल्या कार्यकर्त्यांची रिक्षाच चालवली आहे. विशेष म्हणजे इम्तियाज जलील यांनी कार्यकर्त्याची नवी कोरी रिक्षा चालवली आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोयं.
नेत्यांना आपल्या कार्यकर्त्यांना नेहमीच खुश ठेवावे लागते. आपण पाहिले असेल की, कार्यकर्त्याच्या लग्न असो किंवा वाढदिवस नेते मंडळी हजेरी लावतात म्हणजे लावतातच…बऱ्याच वेळा कार्यकर्ते वाहने खरेदी करतात, त्याच्या उध्दाटनाला सुध्दा कार्यकर्ते आपल्या नेत्याला बोलावतात आणि नेते मंडळीही हजारो काम सोडून जातात म्हणजे जातातच. आता इकडे आैरंगाबादमध्ये खासदार इम्तियाज जलील यांनी तर चक्क आपल्या कार्यकर्त्यांची रिक्षाच चालवली आहे. विशेष म्हणजे इम्तियाज जलील यांनी कार्यकर्त्याची नवी कोरी रिक्षा चालवली आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोयं.