Thane | एमआयएमच्या भिवंडी शहराध्यक्षावर खंडणी आणि बलात्काराचे आरोप, इम्तियाज जलील म्हणतात…
एमआयएम भिवंडी शहराध्यक्ष खालिद गुड्डू यांच्या विरोधात खंडणी आणि बलात्काराचे वेगवेगळे गुन्हे वेळोवेळी नोंदवून शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत त्यांना जामीन मिळू नये यासाठी काम करीत असल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला.
एमआयएम भिवंडी शहराध्यक्ष खालिद गुड्डू यांच्या विरोधात खंडणी आणि बलात्काराचे वेगवेगळे गुन्हे वेळोवेळी नोंदवून शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत त्यांना जामीन मिळू नये यासाठी काम करीत असल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला. खालिद गुड्डू याचे राजकीय प्रस्थ शहरात वाढत असल्याने राजकीय पक्षांनी हे षडयंत्र रचले असून महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांची मुंबई येथे भेट घेऊन या सर्व गुन्ह्यांची एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे. एमआयएम पक्षाची ताकद शहरात वाढत असून खालिद गुड्डू प्रकरणात न्याय न मिळाल्यास पोलीस उपायुक्त कार्यालया समोर पक्ष प्रमुख असउद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जाईल असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला.