“फडणवीस साहेब, एकटे औरंगाबादमध्ये फिरून दाखवा”, इम्तियाज जलील यांचं फडणवीसांना आव्हान
फडणवीस साहेब, लोकांचा शिवसेना आणि भाजप दोघांवरही रोष आहे. तुम्ही भाजप नगरसेवकाच्या वॉर्डात एकटे फिरलात तर जनता तुम्हाला रिकाम्या हंड्याने हाणेल, असा इशारा खासदार जलील यांनी दिला.
आज पाणी प्रश्नावरून आंदोलन करणाऱ्या भाजपने स्वतः महापालिकेच्या सत्तेत असताना काय केले, असा सवाल खासदार इम्तियाज जलील यांनी केला. समांतर योजनेचा निर्णय भाजप शिवसेनेने घेतला होता. ही कंपनी भाजपच्याच एका नेत्याची होती. मात्र ती पूर्णत्वास नेली नाही. सत्तेत असतानाही आपण जनतेला लुटून खाल्ले आणि आता हा मोर्चा काढताय, फडणवीस साहेब, लोकांचा शिवसेना आणि भाजप दोघांवरही रोष आहे. तुम्ही भाजप नगरसेवकाच्या वॉर्डात एकटे फिरलात तर जनता तुम्हाला रिकाम्या हंड्याने हाणेल, असा इशारा खासदार जलील यांनी दिला.
Published on: May 16, 2022 03:45 PM