मविआ आणि महायुतीचं ठरेना… मुंबईच्या लोकसभा जागांचा तिढा काही सुटेना
मुंबईतील ६ मतदारसंघापैकी फक्त दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघातील लढत स्पष्ट झालीये. मुंबईतील तीन मतदारसंघ असे आहेत, जिथे एकाबाजूचा उमेदवार जाहीर झालाय पण दुसऱ्या बाजूचा नाही. त्यात उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि दक्षिण मुंबई या जागेचा समावेश आहे.
राज्यातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणूकीचं मतदान पार पडलंय. मात्र अद्याप मुंबईतील जागांचा तिढा महायुती आणि महाविकास आघाडीत सुद्धा कायम आहे. त्यामुळे इच्छुकांची धाकधूक चांगलीच वाढली आहे. दरम्यान, आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी पार पडणार आहे. असं असलं तरी संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई लोकसभा मतदार संघातील तिढा अद्याप कायम आहे. मुंबईतील ६ मतदारसंघापैकी फक्त दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघातील लढत स्पष्ट झालीये. दक्षिण मध्य मुंबईतून शिंदे गटाकडून राहुल शेवाळे विरुद्ध ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्या लढत होणार आहे. दुसरीकडे उत्तर पूर्व मुंबईतून भाजपकडून मिहीर कोटेचा विरूद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे लोकसेभेच्या रिंगणात उतरले आहेत. मुंबईतील तीन मतदारसंघ असे आहेत, जिथे एकाबाजूचा उमेदवार जाहीर झालाय पण दुसऱ्या बाजूचा नाही. त्यात उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि दक्षिण मुंबई या जागेचा समावेश आहे.