नगरमध्ये क्लायमॅक्स सुरू, तुतारी वाजवा अन्… अमोल कोल्हे यांनी निलेश लंकेंना दिली खुली ऑफर
अहमदनगरमध्ये लोकसभेसाठी सुजय विखे पाटील हे पुन्हा खासदारकीसाठी सज्ज आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाच्या निलेश लंके यांनी दंड थोपटले. पण निलेश लंके आणि सुजय विखे पाटील हे दोघं युती धर्मात एकत्र आहेत. तिकीटासाठी दावे दोघांचे आहेत मात्र तिकीटासाठी जागा एक...
मुंबई, ६ मार्च २०२४ : अहमदनगरमध्ये खासदार अमोल कोल्हे यांच्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा समारोप झाला. मात्र यानंतर नगरच्या राजकारणात क्लायमॅक्सची सुरूवात झाल्याची चर्चा आहे. अमोल कोल्हे यांनी जाहीरपणे निलेश लंके यांना शरद पवार यांच्या गटातून खासदारकी लढण्याची ऑफर दिली आहे. दरम्यान, अहमदनगरमध्ये लोकसभेसाठी सुजय विखे पाटील हे पुन्हा खासदारकीसाठी सज्ज आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाच्या निलेश लंके यांनी दंड थोपटले. पण निलेश लंके आणि सुजय विखे पाटील हे दोघं युती धर्मात एकत्र आहेत. तिकीटासाठी दावे दोघांचे आहेत मात्र तिकीटासाठी जागा एक. नगरमध्ये आमदार निलेश लंके यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्या महानाट्याचं आयोजन केले होते. चार दिवस हे महानाट्य चाललं प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. वाढदिवस आणि महानाट्याच्या निमित्ताने निलेश लंकेनी विखे पिता-पुत्रांना शह देण्यासाठी शक्तिप्रदर्शन केलं. कार्यक्रमस्थळी फक्त लंके आणि त्यांच्या पत्नीचे मोठे पोस्टर लागलेले होते. आणि इतर बॅनरवर अजितदादांसह शरद पवार यांच्यासह देशाचे नेतृत्व पवार साहेब सामान्य आमदाराच्या घरी भेटीला असे बॅनर झळकले. यावेळी अमोल कोल्हेंनी महानाट्याच्या समारोपानंतर लंकेंना खुली ऑफर दिली. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट