VIDEO : Sanjay Raut on Violence | भाजपकडून पेटवा-पेटवीचं काम, खरे दंगलखोर वेगळेच; राऊतांचा विरोधकांवर निशाणा

| Updated on: Nov 13, 2021 | 11:30 AM

शिवसेनेने हिंदुत्वाचा विचार आणि आधार कधीही सोडलेला नाही. आमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये सर्व जातीधर्मांना स्थान आहे. हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रीयत्व आहे. जे या राष्ट्राला आणि मातृभूमीला मानतात, ते आमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत बसतात, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेने कधीच मुस्लिमांना ठरवून विरोध केला नाही. शिवसेना ही सर्वसमावेशक असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. शिवसेनेने हिंदुत्वाचा विचार आणि आधार कधीही सोडलेला नाही. आमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये सर्व जातीधर्मांना स्थान आहे. हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रीयत्व आहे. जे या राष्ट्राला आणि मातृभूमीला मानतात, ते आमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत बसतात, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात पेटलेल्या दंगलींचे कारण काय असा प्रश्न विचारला असता, संजय राऊत म्हणाले, ज्या रझा अकादमी संघटनेद्वारे हे लोण पसरवलं जातंय, त्यामागे कोणता पक्ष आहे, हे सर्वश्रुत आहे. अनेक वर्षांपासून या संघटनेला भाजपचेचे खतपाणी आहे.

VIDEO : Amravati | त्रिपुरातील हिंसेचे दुसऱ्या दिवशीही पडसाद , बंदला हिंसक वळण
Yashomati Thakur on Violence | यूपी निवडणुकीसाठी आंदोलनात दंगली घडवल्याचा संशय : यशोमती ठाकूर