VIDEO : Breaking | काल चंद्रकांतदादा म्हणाले माजी मंत्री म्हणू नका, आज मुख्यमंत्री म्हणाले भावी सहकारी

| Updated on: Sep 17, 2021 | 1:19 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा वादळी ठरला. मराठवाडा मुक्तीदिनाच्या पार्श्वभूमीवर भाषण करताना त्यांनी मराठवाड्यासाठी लोकप्रिय घोषणा केल्या, विरोध करणाऱ्या एमआयएमला उत्तर दिलं, तर चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर जोरदार टोला लगावला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा वादळी ठरला. मराठवाडा मुक्तीदिनाच्या पार्श्वभूमीवर भाषण करताना त्यांनी मराठवाड्यासाठी लोकप्रिय घोषणा केल्या, विरोध करणाऱ्या एमआयएमला उत्तर दिलं, तर चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर जोरदार टोला लगावला. मला कळलंय की चंद्रकांत पाटील तिन्ही पक्षापैकी एका पक्षात प्रवेश करतायत, असं ते म्हणाले. मला माजी मंत्री म्हणू नका. पुढच्या दोन-तीन दिवसांत बघा काय होतंय, असं म्हणून चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या राजकारणात भूकंप केला होता. चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचे कालपासून अर्थ अन्वयार्थ लावले जात होते. शिवसेना-भाजप एकत्र येणार असल्याच्या चर्चाही होत होत्या.

VIDEO : Vijay Wadettiwar | महाज्योतीच्या UPSC चाचणी परीक्षेला मुदतवाढ, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 17 September 2021