कार चालकाचं नियंत्रण सुटलं अन् वाहत्या कॅनलमध्ये कार पडली, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
VIDEO | रस्त्याने जाणाऱ्या चारचाकी वाहनाच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी रस्त्याशेजारी आसलेल्या वाहत्या कॅनलमध्ये पडली, कॅनलमध्ये वाहते पाणी असल्याने कार वाहू लागली अन् कुठं घडला धक्कादायक प्रकार?
पुणे, १२ ऑगस्ट २०२३ | पुणे जिल्ह्यातील खंबाटकीघाट ता.खंडाळा येथे रस्त्याने जाणाऱ्या चारचाकी वाहनाच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी रस्त्याशेजारी आसलेल्या वाहत्या कॅनलमध्ये पडली. कॅनलमध्ये वाहते पाणी असल्याने कार वाहू लागली. कार मध्ये पाचजण प्रवास करत होते. त्यात एक दोन पुरुष एक महिला व दोन अल्पवयीन मुले होती. वेदांत कंपनीतील कामगार कंपनीच्या टेरेस्टवर जेवण करत असताना ही घटना दिसली. लागलीच ते किमगार घटनास्थळी पोहचले. याच वेळी गाडी वाहत जात असताना कंपनीच्या व स्थानिक तरुणांना कार मधील सर्वांना सुखरूप बाहेर काढून त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी प्रसाद पांडुरंग गोळे (शिंद भोर) वेदांत इक्विप सेल्स अँड सर्व्हिस खंडाळा या कंपनीतील मधील अक्षय कांबळे, लक्ष्मण जगताप, सचिन माने व सहकारी, आणि उपस्थित असणाऱ्या सर्वांनी एर्टिका गाडीतील पाच जणांना सुखरुप बाहेर काढले आहे. भोर तालुक्यातील प्रसाद गोळे व सहकार्यांनी कौतुकास्पद कार्य केले असून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.