ST Bus : लालपरी पूर्वपदावर, ST संपातील 74 हजार कर्मचारी कामावर रूजू

| Updated on: Apr 21, 2022 | 10:21 AM

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील एसटीचे 94 टक्के कर्मचारी कामावर परतले आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.

मुंबई : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील एसटीचे (ST) 94 टक्के कर्मचारी कामावर परतले आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.लालपरी पूर्वपदावर आली आहे. बुधवारी राज्यातील तेवीस हजारांहून अधिक एसटी फेऱ्या झाल्या. दरम्यान, एसटी पूर्वपदारव आल्यानं प्रवाशांना आताही राज्यात (State) प्रवास एसटीने करता येणार आहे. एसटी संपामुळे प्रवाशांचे मोठे हाल होतं होते. आता एसटी कर्मचारी कामावर रुजू होत असल्यानं प्रवाशांना आपल्या गावाला एसटीनं जाता येणार आहे. राज्यातील अनेक भागात एसटीने (ST Bus) प्रवासी जातात. कारण, अनेक ठिकाणी रेल्वेची अद्यापही सुविधा नाहीये. याठिकाणच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Published on: Apr 21, 2022 10:18 AM
Param Bir Singh : अनुप डांगे प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग, परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ
संत शिरोमणी देव मामलेदार महाराजांच्या मंदिराच्या गाभाऱ्यास 171 किलो द्राक्षांचा आरास