मुंबईत आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदेंचे बॅनर्स
शिवसेना नेते आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर्स लावण्यात आले आहेत.
मुंबई: शिवसेना नेते आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदार संघ आहे. तिथून ते आमदार आहेत. याच वरळी मध्ये एकनाथ शिंदे यांचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. सध्या गणेशोत्सवाची धूम आहे. त्यामुळे मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी नेत्यांचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे गट आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये सध्या राजकीय कलगीतुरा रंगला आहे.