Mumbai Rain Alert | मुंबईसह उपनगरात 4 दिवस ऑरेंज अलर्ट जारी
मुंबई शहर व उपनगरासाठी चार दिवस ‘ऑरेंज अॅलर्ट’ जारी केला आहे. हवामान विभागाने हा इशारा दिला आहे.
मुंबईतील अनेक भागाच पावसाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मान्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. त्यामुळे पुढील चार दिवस मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार व अतिमुसळधार पाऊस पडणार असून भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) याबाबत आज अॅलर्ट जारी केला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवस ‘रेड अॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे, तर मुंबई शहर व उपनगरासाठी चार दिवस ‘ऑरेंज अॅलर्ट’ जारी केला आहे. गेले दोन-तीन दिवसांपासून मुंबई शहरात पावसाची रिपरिप सुरू आहे. मात्र आता जोर वाढणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने केला आहे.