Mumbai | मुंबईत भाज्यांच्या दरांमध्ये दुपटीने वाढ, आवक कमी झाल्यामुळे भाववाढ

Mumbai | मुंबईत भाज्यांच्या दरांमध्ये दुपटीने वाढ, आवक कमी झाल्यामुळे भाववाढ

| Updated on: Dec 21, 2021 | 6:09 PM

भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे ही भाववाढ झालेली आहे, अशी माहिती भाजीविक्रेत्यांनी दिली आहे. या संपूर्ण भाववाढीचा परिणाम भाजी व्यवसायावरती होत असल्याने खूप मोठा तोटा भाजी विक्रेत्यांना सहन करावा लागत आहे.

मुंबई : मुंबईमध्ये भाजीचे दर (Vegetable Price) गगनाला गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईमधील भाजी मंडईमध्ये भाज्यांच्या दरांमध्ये दुपटीने वाढ झालेली आहे. भेंडी, गवारने जवळपास शंभरी गाठली आहे. भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे ही भाववाढ झालेली आहे, अशी माहिती भाजीविक्रेत्यांनी दिली आहे. या संपूर्ण भाववाढीचा परिणाम भाजी व्यवसायावरती होत असल्याने खूप मोठा तोटा भाजी विक्रेत्यांना सहन करावा लागत आहे. भाज्यांचे दर वाढल्यामुळे ग्राहक महाग भाज्या घेणे टाळत आहेत. त्यामध्येही भेंडी आणि गवार यांच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्याने ग्राहक भेंडी आणि गवार खरेदी करणे टाळत आहेत.

Kavathe Mahankal Election : किमान समान कार्यक्रमाचं पालन केलं गेलं नाही, रोहित पाटलांचं वक्तव्य
Devendra Fadnavis Live | महाराष्ट्रात लोकशाही नाही तर ‘रोकशाही’ आणि ‘रोखशाही’ सुरु : देवेंद्र फडणवीस