नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीत अचानक वाढ, निफाडचा पारा घसरला
उत्तर भारतात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट पसरली आहे. नाशिक मध्ये आज थंडीचा पारा 7.3 एवढा खाली घसरला.
उत्तर भारतात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट पसरली आहे. नाशिक मध्ये आज थंडीचा पारा 7.3 एवढा खाली घसरला, तर दुसरीकडे निफाड तालुक्यात राज्यातील नीचांकी 6.1 एवढं तापमान नोंदवण्यात आलं आहे. आधी झालेला अवकाळी पाऊस, त्यानंतरची गारपीठ आणि आता थंडीचा कडाका यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.. नाशिक मध्ये परतलेल्या थंडीचा द्राक्षांवर काय परिणाम होतोय.