VIDEO : MahaVikas Aghadi चं स्टेअरिंग ठाकरेंच्याच हाती, Sanjay Raut असं का म्हणाले?

| Updated on: Feb 11, 2022 | 1:07 PM

महालक्ष्मी येथील विकास कामांची उपमुख्यमंत्री अजित पवार  आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे  यांनी एकत्र पाहणी केली. यावेळी दोन्ही नेते एकाच गाडीत बसून गेले. इतकेच नव्हे तर आदित्य ठाकरे स्वत: गाडी चालवत होते. शिवसेना नेते संजय राऊत  यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दोन्ही नेते एकत्र विकास कामांची पाहणी करत आहेत.

महालक्ष्मी येथील विकास कामांची उपमुख्यमंत्री अजित पवार  आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे  यांनी एकत्र पाहणी केली. यावेळी दोन्ही नेते एकाच गाडीत बसून गेले. इतकेच नव्हे तर आदित्य ठाकरे स्वत: गाडी चालवत होते. शिवसेना नेते संजय राऊत  यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दोन्ही नेते एकत्र विकास कामांची पाहणी करत आहेत. एकत्र सोबत जात आहेत ही उत्तम गोष्ट आहे. पण त्यामुळे भाजपच्या पोटात कळ येत आहे. दाब दबावाचे राजकारण करून, धमक्या देऊनही महाविकास आघाडीला तडा जात नाही ही भाजपची पोटदुखी आहे, असं सांगतानाच या सरकारचं स्टेअरिंग ठाकऱ्यांच्याच हाती आहे आणि राहील, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

Karnataka Hijab वादाचे Amravati मध्ये पडसाद, Muslim समाज जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा
VIDEO : राजकीय हवा कशीही असू द्या, मलबार हिलची हवा चांगली आहे – CM Uddhav Thackeray