Parbhani | परभणीत गर्भवती महिलेला ताफ्यावर बसवून रूग्णालयात नेलं
तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर आला आणि त्यामुळे मानवत तालुक्यातील टाकळी नीलवर्ण या गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला होता. त्या परिस्थितीमध्ये गावातील गर्भवती महिलेला प्रसुती कळा सुरू झाल्या.
परभणी : नदीला आलेल्या पुरामुळे, परभणीच्या मानवत तालुक्यातील टाकळी नीलवर्ण या गावातील, गर्भवती महिलेला थर्माकॉलपासून बनवण्यात आलेल्या तराफ्यावर झोपवून नेण्याची वेळ गावकाऱ्यांवर आली. तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर आला आणि त्यामुळे मानवत तालुक्यातील टाकळी नीलवर्ण या गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला होता. त्या परिस्थितीमध्ये गावातील गर्भवती महिलेला प्रसुती कळा सुरू झाल्या. परंतु पुलावरून पाणी वाहत असल्याने तो मार्गही बंद होता. परिणामी गावातील तरुणांच्या मदतीने, या महिलेला थर्माकॉल सीटवरून नदी पार करावी लागली. त्यानंतर संबंधित महिलेची, मानवतच्या शासकीय रुग्णालयांमध्ये डिलवरी झाली असून, महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. आई आणि बाळ सुखरूप आहे.