VIDEO : Pimpri Chinchwad | पिंपरी चिंचवडमध्ये द बर्निंग बसचा थरार, PMPML बसने घेतला अचानक पेट
पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड शहरामध्ये ‘द बर्निंग बस’चा थरार पहायला मिळाला. दापोडी भागात मुळा नदीच्या पुलावर पीएमपीएमएलच्या बसला अचानक आग लागली. यावेळी बसमध्ये 20 ते 25 प्रवासी होते. मात्र सुदैवाने चालकाने प्रवाशांना वेळीच बसमधून उतरवल्यामुळे या दुर्घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड शहरामध्ये ‘द बर्निंग बस’चा थरार पहायला मिळाला. दापोडी भागात मुळा नदीच्या पुलावर पीएमपीएमएलच्या बसला अचानक आग लागली. यावेळी बसमध्ये 20 ते 25 प्रवासी होते. मात्र सुदैवाने चालकाने प्रवाशांना वेळीच बसमधून उतरवल्यामुळे या दुर्घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. दापोडी भागात मुळा नदीच्या पुलावर असताना आधी इंजिनमधून धूर येताना दिसला, त्यामुळे बस ड्रायव्हरने सर्व प्रवाशांना बसमधून तात्काळ खाली उतरवले. त्यानंतर बसने पेट घेतला. आग भडकल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.