Radhakrishna Vikhe Patil | राजकारणात कोणीच मित्र आणि शत्रू नसतात, त्यामुळे काहीही चमत्कार होऊ शकतो
राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो. कुणीही कायमचा मित्र नसतो. त्यामुळे काहीही चमत्कार होऊ शकतो, असं सूचक विधान भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो. कुणीही कायमचा मित्र नसतो. त्यामुळे काहीही चमत्कार होऊ शकतो, असं सूचक विधान भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल औरंबादेतील एका कार्यक्रमात विरोधकांचा उल्लेख भावी सहकारी असा केला होता. त्यानंतर भाजप नेत्यांनी युतीचे संकेत दिले होते. आता त्यात राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उडी घेतली आहे. विखे-पाटील यांनीही सूचक विधान करून युतीच्या चर्चांना हवा दिली आहे. राजकारणात काहीही होऊ शकते. महाविकास आघाडीची जी मोट बांधली गेली आहे. त्याला काही वैचारिक आधार नाही. सत्तेसाठी हे लोक एकत्रं आले आहेत. सत्ता नसतानाही शिवसेना-भाजपाने 20-25 वर्ष एकत्र राहून काम केलं आहे. त्यामुळे आगामी काळात हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे, असं विखे-पाटील म्हणाले.