Eknath Khadse | हे राजकीय हेतूने प्रेरीत, जाणीव पूर्वक मला, कुंटुबाला छळण्याचा प्रयत्न : खडसे

| Updated on: Jul 08, 2021 | 11:24 AM

भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांची जानेवारी महिन्यातही ईडीने चौकशी केली होती. आता पुन्हा एकदा चौकशीसाठी खडसे ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत.

पुण्यातील भोसरी एमआयडी जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर ईडीने खडसेंनाही समन्स बजावलं होतं. ईडीला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं खडसेंनी कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.

ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर खडसेंनी आज पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी खडसे काहीतरी मोठा गौप्यस्फोट करणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र त्याअगोदरच प्रकृती बिघडल्याच्या कारणास्तव त्यांची पत्रकार परिषद रद्द करण्यात आली होती. त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे खडसे ईडी चौकशीला जाणार की नाही, याबाबत तर्कवितर्क रंगले होते. परंतु सकाळी अकराच्या सुमारास ते अंमलबजावणी संचलनायच्या कार्यालयात दाखल झाले.

Published on: Jul 08, 2021 11:24 AM
Nanded | जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभार, सरपंचाने अधिकाऱ्यांसमोर जाळल्या फाईल
Kapil Patil LIVE | मला मनापासून आंनद झाला, कपिल पाटील पंचायत राज्य राज्यमंत्री