राज ठाकरेंच्या सभेसाठी पुण्यात मनसेची जोरदार पोस्टरबाजी

राज ठाकरेंच्या सभेसाठी पुण्यात मनसेची जोरदार पोस्टरबाजी

| Updated on: May 20, 2022 | 7:35 PM

अयोध्या (Ayodhya) तर नाही पण पुण्यात मात्र राज ठाकरे दाखल झाले आहेत. परवा म्हणजेच 22 मेला राज ठाकरे यांची सभा होणार आहे.

पुणे : अयोध्या (Ayodhya) तर नाही पण पुण्यात मात्र राज ठाकरे दाखल झाले आहेत. परवा म्हणजेच 22 मेला राज ठाकरे यांची सभा होणार आहे. ही सभा जंगी घेण्याच्या सूचना आधीच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. आता मध्ये दोन दिवस आहेत. या दोन दिवसांत पुण्यातील पक्षाच्या स्थितीचा आढावा तसेच 22 तारखेच्या सभेच्या तयारीचा आढावा राज ठाकरे घेणार आहेत. दोन दिवसांपूर्वीच राज ठाकरे पुण्यातून मुंबईकडे रवाना झाले होते. प्रकृतीच्या कारणास्तव पुणे दौरा अर्धवट सोडून ते मुंबईला गेले होते.

Published on: May 20, 2022 07:35 PM
नृसिंहाच्या आशीर्वादाने फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील – हर्षवर्धन पाटील
वर्षावर मुख्यमंत्र्यांनी घेतली अपक्ष आमदारांची बैठक