मुलींना केरळ नाही दाखवले तरी चालेल पण…, ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या समर्थनात भाजपची बॅनरबाजी
VIDEO | 'द केरळ स्टोरी'च्या समर्थनात भाजपची बॅनरबाजी, सर्व महिला वर्गाला केलं चित्रपट पाहण्याचं आवाहन
पुणे : ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय. या चित्रपटात अदा शर्मा ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळते. 5 मे रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अजूनही काही राज्यांमध्ये या चित्रपटाला विरोध केला जात आहे. मात्र या वादानंतरही चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. अशातच राजकीय पक्ष देखील या चित्रपटाला समर्थन देताना दिसताय. पुण्याच्या भोरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येतं, द केरळ स्टोरी या चित्रपटाच्या समर्थनाचे बॅनर लावल्याचे दिसतेय. तर हा चित्रपट बघण्याचं आवाहन नागरिकांना केलं जातंय. भोर शहरात ठिकठिकाणी हे बॅनर लावण्यात आलेत. या बॅनरवर एक वेळ मुलींना केरळ दाखवले नाही तरी चालेल, पण द केरळ स्टोरी अवश्य दाखवा, सर्व माताभगिनींनी जवळच्या चित्रपटगृहात जाऊन अवश्य हा चित्रपट पहावा, असे आवाहन करणारा आशय असणारे बॅनर लावले आहेत.