ISRO चा सायंटिस्ट आहे, असं सांगणारा निघाला झोलर; काय आहे प्रकरण? Watch Video
tv9 Special Report | आधी मुलाखती दिल्या अन् नंतर भांडाफोड झाला, स्वतःला प्रसिद्धी मिळावी म्हणून केला प्रयोग मात्र झाली पोलखोल, बघा काय सांगून करत होता फसवणूक?
मुंबई, ३१ ऑगस्ट २०२३ |आपण इस्रोचे सायंटिस्ट आहोत आपणच चंद्रयानच्या डिझाईनमध्ये वाटा उचलला असं सांगणाऱ्या एका व्यक्तीचा भांडाफोड झालाय. सुरतमधल्या या व्यक्तीला अटक झालीय, मात्र शिकवणी घेणारा हा एक शिक्षक स्वतःला सायंटिस्ट का म्हणवून घेत होता, यावरून सगळ्यांना प्रश्न पडलाय. इस्रोच्या शास्रज्ञांनी सर्वात कमी खर्चात चंद्रयान ३ यशस्वी केलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ भारताचं यान उतरवलं., त्याच यानाची डिझाईन आपण केल्याचा दावा हा व्यक्ती करत होता. या व्यक्तीचं नाव मिथुल त्रिवेदी आहे. तो गुजरातच्या सूरतमधला राहणारा आहे. चंद्रयान यशस्वी झाल्यानंतर या व्यक्तीनं अनेक स्थानिक वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या आणि आपण इस्रोचे शास्रज्ञ असून चंद्रयान कसं डिझाईन केलं याची वर्णनंही त्यानं टीव्हीवर सांगितली. मात्र पोलिसांनी जेव्हा तपास सुरु केला., तेव्हा हा व्यक्ती बोगस शास्रज्ञ निघाला. त्याच्याकडून इस्रोचा सदस्य असलेलं बनावट ओळखपत्रही जप्त केलं गेलं. वास्तवात हा व्यक्ती शास्रज्ञ नसून मुलांची शिकवणी घ्यायचा. प्रसिद्धी मिळून शिकवणीला मुलांची संख्या वाढावी यासाठी त्याचा हा बनाव होता. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट